सावद्याचा सौरभ महाजन सीडॅक परीक्षेत देशात पहिला
सावदा : शहरातील गांधी चौक भागातील रहिवासी सौरभ कमलाकर महाजन या विद्यार्थ्याने सीडॅक इन्ट्रन्स परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकावत शहराचा नावलौकीक वाढवला आहे. तो बी.ई.झाला असून त्याने प्रीकॅट क्लास या अभ्यासक्रमात ही परीक्षा उत्तीर्ण झाला. या यशाबद्दल माजी आमदार रमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक सुधाकर पाटील, सुनील पाटील, त्याचे वडील कमलाकर महाजन व गांधी चौक मित्र मंडळाने त्याचे अभिनंदन केले आहे.




