सराफा दुकान लुटताना सराफाची हत्या : आरोपी पसार


नालासोपारा : सराफा दुकान लुटण्यासाठी आलेल्या आरोपींनी सराफाने कडाडून विरोध केल्यानंतर आरोपींनी 45 वर्षीय सराफाची हत्या केली व दुकानातील सोने लुटून आरोपी पसार झाले. नालासोपारा येथे पश्चिमेकडील एसटी डेपो रोडवरील एका ज्वेलर्सच्या दुकानात ही घटना घडली. सराफाच्या हत्येनंतर पोलिसांनी आरोपींचा कसून शोध सुरू केला आहे.

हत्या करून आरोपी पसार
नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपो रोडवरील इमारतीमध्ये किशोर जैन (45) यांच्या मालकीचे साक्षी ज्वेलर्स हे दुकान असून शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते लॉकर रूममध्ये असताना दोन आरोपी दुकानात शिरून अर्धा तास सोने लुटण्याचा प्रयत्न केला. पण किशोर यांनी त्यांना विरोध केल्याने आरोपींनी त्यांच्या डोक्यात, मानेवर, अंगावर धारदार हत्याराने 8 ते 10 वार केले. यात ते गंभीर जखमी झाले होते. यानंतर दोन्ही आरोपी नालासोपारा रेल्वे स्थानकाकडे चालत गेले. जखमी ज्वेलर्स मालकाला आजूबाजूच्या लोकांनी अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. पण रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. घटनेनंतर नालासोपारा पोलीस, घटनास्थळी पोहोचले. या दोन्ही चोरांनी किती सोने चोरून नेले हे अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !