नगरपालिकेच्या सभा आता ऑफलाइन घेण्यास परवानगी द्या


मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांची मागणी

सावदा : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिकेत मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेली ऑनलाइन सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीपासून नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने हामोबाईल नेटवर्क कधी ऑन कधी ऑफ होत असल्याने सदरील सभेत कोणता विषय सुरू आहे? किंवा कोणत्या विषयावर आपले मत व्यवस्थित मांडावे वा कोणता विषय मंजूर करावा की विरोध नोंदवावा याबाबत नगरसेवकांना त्यावेळी मोठी समस्या निर्माण होऊन त्रास सहन करावा लागला. हा प्रकार टाळण्यासाठी कोरोना आटोक्यात आल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभा ऑफलाईन घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी येथील नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन केली आहे.

तर सुरळीत होईल कामकाज
नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे सभेतील आवाज येत नाही किंवा कनेक्ट होत नाही म्हणून चालू सभेच्या वेळी नगरसेवकांना समस्या येतात. याकडे लक्ष देऊन सभा ऑफलाईन सभा घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे. दरम्यान, ही मागणी रास्त व वस्तुस्थितीला अनुसरून आहेत व यासंदर्भात लवकरच मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत लवकरच निवेदन देणार असल्याची माहिती येथील नगरसेविका नंदा मिलिंद लोखंडे यांनी दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !