नाथाभाऊ लवकरच जिल्ह्यात आमदार म्हणून नव्हे तर नामदार म्हणून परतणार


अ‍ॅड.रवींद्र पाटील : माजी मंत्री खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त निंभोरा परीसरात 11 कलमी कार्यक्रम

निंभोरा : ‘झाड माझ्या नाथाभाऊंचे’ हा उपक्रम कौतुकास्पद असून हा निंभोरा पॅटर्न जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राबविणार असून माजी मंत्री नाथाभाऊ लवकरच जिल्ह्यात फक्त आमदार नव्हे तर नामदार म्हणून परततील, असा आशावाद राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील यांनी येथे व्यक्त केला. कृषी विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा 2 सप्टेंबर रोजी येणार्‍या 69 व्या वाढदिवसानिमित्त निंभोरा परीसरातील राष्ट्रवादीप्रेमींनी 2 ते 9 सप्टेंबर दरम्यान वाढदिवस सप्ताहाचे नियोजन जाहीर केले. प्रसंगी अ‍ॅड.रवींद्र भैय्या यांनी मार्गदर्शन केले.

वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
जिल्ह्यात माजी मंत्री खडसे यांच्या वाढदिवसाचे ‘औचित्य साधत झाड माझ्या नाथाभाऊंचे’ या ब्रीद वाक्यासोबत वृक्षारोपण कार्यक्रम, पक्ष संघटन, शाखा उद्घाटन, राष्ट्रवादीचे सदस्य नोंदणी अभियान, जनहितार्थ योजनांसाठी शिबिर, तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, ज्येष्ठ नागरीकांसाठी अनुदान योजना, महिलांच्या बचत गटांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.




यांची व्यासपीठावर उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष सोपान पाटील, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, जळगावचे माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सावदा नगरीचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, रावेर तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, राष्ट्रवादी रावेर शहराध्यक्ष शेख मेहमूद, जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत नीळ, निंभोर्‍याचे माजी सरपंच डिगंबर चौधरी, निंभोरा सरपंच सचिन महाले, महिला तालुकाध्यक्ष माया बारी, नंदिनी पंत, आशा सोनवणे, सुरेखा सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यांनीही व्यक्त केले मनोगत
प्रास्ताविक राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी केले. कार्यक्रमात माजी आमदार अरुण पाटील, राजेश वानखेडे, सोपान पाटील, रमेश पाटील, दीपक पाटील, अशोक लाडवंजारी, वाय.डी.पाटील, मनोहर तायडे, प्रणित महाजन, निंभोरा सरपंच सचिन महाले मनोगत व्यक्त केले.

गावासाठी टँकर उपलब्ध करण्याची घोषणा
कार्यक्रमात निंभोरा सरपंच सचिन महाले यांनी नाथाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त निंभोरा गावासाठी स्वखर्चाने मोफत टँकर देण्याचे जाहीर केले. यासाठी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी सरपंच महाले यांचा सन्मान केला. सूत्रसंचालन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका समन्वयक राज खाटीक तर आभार राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य शेख दिलशाद यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !