वरणगाव परीसरातील युवकांनी चित्रपट क्षेत्रात टाकले पाऊल


‘प्यार जहाँ संघर्षही सर्व शक्तिमान’ शॉर्ट फिल्म 28 रोजी यु ट्यूबवर झळकणार

वरणगाव : वरणगाव परीसरात युवकांनी शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले आहे. ग्रामीण भागातील युवकांनी मिळून ‘प्यार जहाँ संघर्षही सर्व शक्तिमान’ नावाची शॉर्ट फिल्म तयार केली असून 28 रोजी ती यु ट्यूबवर प्रदर्शित होणार आहे. ग्रामीण भागातील युवकांमधील टॅलेंट या माध्यमातून जगासमोर येणार असून वरणगावसह पिंपळगावचे नावही या निमित्ताने सर्वदूर झळकणार आहे. प्रेम कथेवर आधारीत ही शॉर्ट फिल्म असून पहिला भाग अर्ध्या तासाचा तर नंतरचा भाग तासाभराचा असणार असून दुसर्‍या भागात चित्रपटातील सस्पेन्सचा उलगडा होणार आहे.

यांचा चित्रपटात सहभाग
डायरेक्टर विशाल बोदडे तर रायटर विष्णू राणे व डीओपी सुयोग नाईक आहेत. शॉर्ट फिल्ममध्ये प्रमुख कलाकार म्हणून विष्णू राणे, अंकिता बोदडे, अंकुश कुमार, ऋषिका इंगळे, अजय मेढे, डॉ.विजय सुरवाडे, कोमल इंगळे, सुनील वाघ, भोला इंगळे, शुभम अवचारे, विजय ठोसर, आनंद हिवरे, संजय डांगे, शुभम मेंढे, पांडुरंग अवचारे, घनश्याम इंगळे, अमोल पाटील, राहुल अवचारे, विशाल इंगळे, रवी इंगळे, आदेश वानखेडे आदी कलाकारांचा सहभाग आहे.




ग्रामीण भागातच चित्रीकरण
ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये मोठे टॅलेंट आहे व या टॅलेंटचा योग्य पद्धत्तीने वापर करून शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. वरणगावसह परीसरातच चित्रपटाचे शुटींग झाले असून स्थानिक कलावंतांना त्यात अधिकाधिक प्रमाणात संधी मिळाली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !