अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून : पतीला अटक
वाघोली : पत्नीचे अनैतिक संबंध आहेत, असा संशय करीत पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार वाघोली (ता:हवेली)येथील मॅजेस्टिक सिटी येथील लेबर कॅम्पमध्ये सोमवारी पहाटेे पाचच्या सुमारास घडला. या घटनेत अनु राजु मिर्झा (28) या विवाहितेचा मृत्यू झाला तर या प्रकरणी पोलिसांनी पती राजु पुनाराम मिर्झा (30, रा. कांचन हॉटेल, खांदवेनगर) यास अअक केली. याप्रकरणी दीर राजेश मिर्झा यांनी फिर्याद दिली असून लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास लोणीकंद वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंदचे पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) राजेश तटकरे करीत आहेत.
