21 वर्षीय पत्नी आढळली 50 वर्षीय व्यक्तीसोबत : पतीने प्रकार पाहताच घडले असे काही….


पुणे : पत्नीचे कुणाशी तरी अफेयर असल्याचा पतीला संशय असल्याने त्याने पत्नीचा पाठलाग केला असता 21 वर्षीय पत्नी 50 वर्षीय व्यक्तीसोबत आढळताच पतीचा संताप अनावर झाला मात्र जाब विचारल्यावर दोघांनी मिळून या पीडीत पतीलाला बेदम मारहाण करुन जखमी केले. कोंढव्यातील बिस्मिला हॉलजवळील कम्युनिटी सोसायटीसमोर मंगळवारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी कोंढव्यात राहणार्‍या 31 वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी 50 वर्षाची व्यक्ती व फिर्यादीच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला त्याच्या पत्नीवर संशय होता. फिर्यादी यांची पत्नी घरातून बाहेर पडल्यावर तो तिचा पाठलाग करुन लागला. पत्नी एका व्यक्तीबरोबर जात होती. त्याने या दोघांना बिस्मिला हॉल कम्युनिटी सोसायटीच्या समोर अडवले. पत्नी व त्या व्यक्तीला तुम्ही दोघे कुठे जाता, असे विचारले. याचा राग येऊन पत्नीने फिर्यादीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्याबरोबरील व्यक्तीने दगडाने मारहाण करुन जखमी केले. कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !