ट्रॅक्टर ट्रॉली उलटली : दोघा मुलांचा मृत्यू


जालना : जालन्यातील आरतखेडा गावाच्या परीसरात दगडांची करणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. चेतन धोत्रे (12) व गणेश निंबोळे (16) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. ही दोन्ही मुले खदानीतून ट्रॅक्टरच्या माध्यमातून दगडांची वाहतूक करीत होती. रस्त्यावरुन ट्रॅक्टर चालवताना गणेश निंबोळे याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन हे दोन मुले ट्रॉलीखाली दबली गेली. या दोन्ही मुलांना परीसरातील नागरीकांनी जाफ्राबाद या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !