लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात


25 हजारांची लाच भोवली : नाशिक एसीबीची कारवाई

नाशिक : तक्रारदाराविरोधात आलेल्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती 25 हजार रुपये मागणार्‍या नामपूर पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक व खाजगी पंटर यांना नाशिक एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली. उपनिरीक्षक मिलिंद मुरलीधर नवगिरे (35) व खाजगी पंटर रमेश कचरू गरूड (50) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

अधिकार्‍याला भोवली लाच
49 वर्षीय तक्राराविरोधात अर्ज आल्यानंतर त्यावर कारवाई न करण्यासाठी खाजगी पंटर गरूड यांच्या मार्फत 31 ऑगस्ट रोजी 30 हजारांची लाच मागितली होती व त्यावर तडजोड होवून पंटरास दोन हजार व नवगिरे यांना 25 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत तक्रार नोंदवल्याने सापळा रचण्यात आला. 1 रोजी रात्री संशयीतांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे, हवालदार माळी, बाविस्कर, प्रकाश महाजन आदींनी यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !