नाथाभाऊंना वाढदिवशी जलसंपदा मंत्र्याचे मोठे गिप्ट : ओझरखेडा धरणात आले पाणी
मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा गुरुवार, 2 सप्टेंबर रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी हतनुर धरणाच्या जलाशयातून ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याच्या कामाचा ऑनलाईन कळ दाबून शुभारंभ केला. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगाव-तळवेल परीसर सिंचन योजनेंतर्गत गुरुवारी ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आल्याने या परीसरातील शेतकरी सुखावले आहेत. या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सहभागी झाले होते.
अॅड.रोहिणी खडसेंच्या पाठपुराव्याला यश
यावेळी व्हिडीओ कॉन्फ्ररसद्वारे संबोधित करताना जयंतराव पाटील म्हणाले की जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी आग्रह धरून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील उपसा सिंचन योजना आणि इतर प्रकल्पांची आढावा बैठक घ्यायला लावली. त्या बैठकीत रोहिणी खडसे खेवलकर यांनी हतनुर जलाशयातून ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याची आग्रही मागणी लावून धरली त्यानुसार अधिकार्यांना निर्देश देऊन तातडीने तांत्रिक अडचणी दुर करण्यास सांगितल्या. अॅड.रोहिणी खडसे यांच्या आग्रहाने मोटार ,विद्युत पुरवठ्याच्या तांत्रिक अडचणी सोडवून एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हतनुर जलाशयातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात येत आहे. यानंतर दरवर्षी उन्हाळ्यात सर्व मोटार विद्युत पुरवठा याच्या चाचण्या घेऊन पावसाळ्यात सुरुवातीलाच ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात येईल.



नाथाभाऊंनी अनेक प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली
एकनाथराव खडसे हे जलसंपदामंत्री असताना त्यांनी संपूर्ण खान्देशात विविध प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली एकनाथराव खडसे यांनी पाठपुरावा करून त्यातील बहुतांशी प्रकल्प पूर्ण केले. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत आम्ही जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला . यातील बहुतांशी प्रकल्पांचे काम जवळपास पूर्णत्वास येत आहे त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी एकनाथराव खडसे, रोहिणी खडसे नेहमी आग्रही असतात. टप्प्याटप्प्यात या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून येत्या दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न राहील. मागील आघाडी सरकारच्या काळात एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने ओझरखेडा धरणाची उंची वाढविण्यात आली या धरणाच्या जलाशायतील पाणी मुख्यत्वे दीपनगर औष्णिक प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले होते त्यावेळी एकनाथराव खडसे यांनी आग्रह धरून ओझरखेडा धरणातील 50 टक्के पाणी ओझरखेडा धरण्याच्या बुडीत क्षेत्रातील शेतकर्यांना सिंचनासाठी देण्यात यावे अशी मागणी लावून धरली होती त्यानुसार ओझरखेडा धरण्याच्या खालील गावातील शेतकर्यांना ओझरखेडा धरणातून बंदिस्त पाईप लाईनद्वारे पाणी उपसा करण्यासाठी परवानग्या देण्यात आल्या आहेत. एकनाथराव खडसे यांना मी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो व आपले सर्वांचे प्रेम असेच एकनाथराव खडसे यांच्यावर कायम ठेवा असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.
यांची होती उपस्थिती
जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, कल्पना पाटील, मंगला पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, सावदा नगराध्यक्षा अनिता येवले, पंचायत समिती सभापती सुवर्णा साळुंखे, किशोर गायकवाड ,युवक जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, सरचिटणीस ईश्वर रहाणे, सोपान पाटील, अरविंद मानकरी, रमेश नागराज पाटील, राजेश वानखेडे, पंकज येवले, उमेश नेमाडे, सय्यद अजगर,अजय भारंबे, गोटू सेठ महाजन, नीळकंठ चौधरी, राजु माळी, यु.डी.पाटील, नामदेव भड, निलेश पाटील, प्रदीप साळुंखे, विकास पाटील, दशरथ कांडेलकर, विलास धायडे, रामभाऊ पाटील, अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, अशोक पाटील, समाधान कार्ले, सुधाकर पाटील, पवनराजे पाटील, दिपक पाटील, उद्धव पाटील, रामदास पाटील, मधुकर राणे, प्रदिप बडगुजर, शाहिद शेख, विशाल महाराज खोले,शिवराज पाटील, अनिल पाटील, अनिल वराडे, भरत अप्पा पाटील, रवींद्र खेवलकर, विजय चौधरी, कल्पेश शर्मा, दीपक वाणी, निलेश पाटील ,आबा भाऊ पाटील कैलास चौधरी, दीपक कोळी,गणेश तराळ,कैलास पाटील, अतुल पाटील, लीलाधर पाटील, विनोद काटे,सुनिल काटे, नंदकिशोर हिरोळे, चंद्रकांत बढे, नारायण चौधरी, उमेश राणे, सुधाकर जावळे, दीपक मराठे, राजेंद्र चौधरी व इतर मान्यवरांच्या हस्ते ओझरखेडा धरण येथे जलपुजन करण्यात आले.

