आठ पुरूषांशी फसवणूक करीत लग्न ; नवरी निघाली ‘एचआयव्ही बाधीत’
फसवणूक प्रकरणी चौघांना अटक : या नवर्यांचीही होणार एचआयव्ही चाचणी
नवी दिल्ली : तब्बल आठ पुरूषांशी लग्न करून पसार झालेल्या नवरीच्या अखेर मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून तिच्यासह रॅकेटमधील अन्य तिघांनाही अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या नवरीची एचआयव्ही चाचणी पॉझीटीव्ह आली आहे तर या तरुणाीने ज्यांच्याशी विवाह केला त्या तरुणांचीही पोलीस आता एचआयव्ही चाचणी करणार आहेत.
फसवणूक करणारी टोळीची पोलिसांच्या जाळ्यात
पंजाबमधील पटीयाला जिल्ह्यामध्ये पोलिसांनी आठ लग्ने करून सासरच्यांकडील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार होणार्या एका लुटारू नवरीसह चार जणांच्या मुसक्या आवळल्या. या तरुणीने आपल्यासोबत तीन तरुणांना घेऊन एक टोळी बनवली होती व ही टोळी लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची फसवणूक करत असे. लग्न झाल्यावर संबंधित वर आणि त्याच्या कुटुंबावर मारहाण आणि हुंड्याची मागणी केल्याचा आरोप करून ही तरुणी पंचायत बोलावत असे. तसेच त्यात निवाडा झाल्यावर संधी साधून सासरच्या कुटुंबातील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार होत असे. या कामामध्ये या तरुणीची आईही तिला मदत करत असे. या तरुणीकडून फसवणूक झालेल्या 8 जणांपैकी तिघे हे हरियाणामधील आहेत. पटियालामधील जुलका परिसरात नवव्या वराचा शोध घेत असताना ती पोलिसांच्या तावडीत सापडली.
विवाह करीत फसवणुकीचा गोरखधंदा
आरोपी तरुणी ही हरीयाणामधील कैथल जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे वय 30 वर्षे आहे. तिचा खरा विवाह 2010 मध्ये पटियालामध्ये झाला होता. त्यातून तिला तीन मुले झाले त्यांचे वय सात ते नऊ वर्षांदरम्यान आहे. त्यानंतर तिचा पती बेपत्ता झाला होता मात्र तिने पतीपासून घटस्फोट घेतला नाही. त्यानंतर चार वर्षांपूर्वी तिने विवाह करून फसवणूक करण्याचा धंदा सुरू केला. ती पंजाब आणि हरियाणामधील अविवाहित, घटस्फोटित आणि विधुरांना शोधून फसवण्याचा धंदा सुरू केला. दरम्यान, आठ विवाह करून फसवणूक केल्यानंतर ही तरुणी नववा विवाह करण्याच्या तयारीत होती. त्याचवेळी ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली. दरम्यान, या तरुणी एचआयव्ही बाधीत निघाल्याने ज्यांच्याशी तिचा विवाह झाला त्या तरुणांची चिंता वाढली असून त्यांच्याही चाचणी करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
