संतापजनक ! : अल्पवयीन बालिकेवर 42 वर्षीय नराधमाचा अत्याचार
नागपूर : अवघ्या साडेतीन वर्षाच्या बालिकेवर शेजार्याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या घडली. नागरीकांना ही बाब कळताच त्यांनी आरोपी नरेश मंडलवार (42) याला चांगलेच चोपून काढले. शेजारी असल्यामुळे पीडित बालिका नरेशच्या घरी ये-जा करीत होती. 29 ऑगस्टला दुपारी पत्नी आणि मुलगा बाहेर गेलेले असताना बालिका नरेशच्या घरी आली. नरेश तिच्याशी जबरदस्ती करीत होता. दरम्यान मुलगी दिसत नसल्यामुळे तिची आई नरेशच्या घरी पोहोचली. तीने नरेशचे कृत्य पाहून त्याला फटकारले आणि मुलीला घरी आणले. तिने सासू आणि पतीला याची माहिती दिली. 30 ऑगस्टला घटनेची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांनी नरेशला बेदम मारहाण करून हुडकेश्वर पोलिसांकडे सोपविले. पोलिसांनी बलात्कार, पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
