गळा चिरून मृतदेह फेकला ; टॅटूवरून पटली ओळख : आरोपीही जाळ्यात


उल्हासनगर : क्षुल्लक कारणावरून एकाचा गळा चिरून आरोपींनी मृतदेह एका तलावात फेकला. पोलिसांनी मयताच्या हातावरील टॅटूच्या आधारे त्याची ओळख पटवून नंतर दोघा आरोपींच्या शिताफीने मुसक्या आवळल्या. उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील स्मशानभूमीच्या तलावात 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी गळा चिरलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. मृतदेहाच्या हातावर टॅटू व चंदू असे नाव होते. पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात नवी मुंबई रबाडे पोलीस ठाण्यात चंद्रकांत शेलार या नावाच्या इसमाची हरवल्याची तक्रार दाखल असल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी मयत चंद्रकांत शेलार यांच्या पत्नी मीना हिच्याशी संपर्क साधला. मृतदेह आपले पती चंद्रकांत शेलार यांचा असल्याची कबुली महिलेने दिल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करीत घणसोली परीसरातील साजन कांबळे व डीवाईन तेलेस घोन्सलवीस यांना अटक केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !