अँटिलियासह हिरेन हत्याप्रकरणांत आरोपपत्र दाखल


मुंबई : अँटिलिया स्फोटके व मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणात एनआयएने मुंबईच्या विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेसह एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा व इतर माजी पोलिसांची नावे आहेत. बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, कोर्टाने एनआयएला प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली. ती संपण्याच्या दोन दिवसांआधीच आरोपपत्र दाखल झाले. यंदा 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरलेली कार आढळली होती तसेच हे प्रकरण ठाण्याचा व्यापारी मनसुख हिरेनच्या मृत्यूशीही संबंधित आहे. या प्रकरणांचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे होता. नंतर तो एनआयएच्या हाती सोपवण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !