मालवाहू पिकअप व चारचाकीत अपघात : दोन जण ठार


बोरगाव मंजू : मालवाहू पिकअप वाहन व चारचाकी वाहनात अपघात होऊन दोघा वाहनांचे चालक ठार झाले. शनिवार, 4 रोजी दुपारी हा अपघात झाला. अकोलाकडून म्हैसांगकडे सिलेंडर वाहून नेणारे मालवाहू पिकअप वाहन (एम.एच.30 बी.डी.0345) व दर्यापूरकडून अकोला कडे जाणारी कार (एम.एच.38-5727) या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातात कारचा चालक ज्ञानेश्वर रवींद्र खेळकर (29, खामगाव) जागीच मृत्यू झाला तर प्रवासी जागृत मोमाया, स्नेहा हे दोघे गंभीर जखमी झाले, पिकअप गाडीचा चालक अब्दुल जुबेर अब्दुल शरीफ (32, रा. दहीहांडा) याचाही मृत्यू झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !