बेळगाव महानगरपालिकेचे भाजपाचे निर्विवाद वर्चस्व


बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह निर्विवाद यश मिळवलं आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या एकूण 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने 36 जागांवर विजय मिळवला तर गेली अनेक वर्षे बेळगावातील मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. एकीकरण समितीच्या पदरात केवळ दोन जागा पडल्या. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली होती. काँग्रेसच्या खात्यात 9 जागा, महाराष्ट्र एकीकरण समितीला 2 जागा मिळाल्या व उर्वरीत 11 जागांवर इतर उमेदवार विजयी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !