स्पिरीटची अवैध तस्करी रोखली : आठ लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त
शिरपूर : सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीतून स्पिरीटची अवैध वाहतूक करणार्या आयशर वाहनावर सोनगीर पोलिसांनी रविवारी धडक कारवाई करीत दोन हजार 800 लिटर स्पिरीट साठा जप्त करीत चालकासह आठ लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
महिला पोलीस कर्मचार्याची गळफास घेत आत्हमत्या

बनावट दारूसाठी स्पिरीटचा वापर
शिरपूर तालुक्यात अवैधरीत्या बनावट दारू तयार करण्यासाठी स्पिरीट आणले जात असल्याची माहिती सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना मिळाली होती. त्यांनी सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करून (एम.एच.18 सी.2111) या क्रमांकाच्या आयशर वाहनातून 2 लाख 80 हजार रुपये किंमतीचे स्पिरिटचे 14 प्लॅस्टिकच्या ड्रममधून 2 हजार 800 लीटर स्पिरीट जप्त करीत चालक ताज्जोदीन इसामोद्दीन शेख (31, रा.लालसरदार नगर, देवपूर, धुळे) यास आयशर सह ताब्यात घेत सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास पीएसआय नामदेव सहारे करीत आहेत.

