एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले
अहमदनगर : माता-पित्यांसह दहा वर्षीय मुलाचे मृतदेह एकाचवेळी आढळलयाने खळबळ उडाली आहे. केडगावातील अथर्व नगरात सोमवारी सकाळी कही घटना उघडकीस आली. मृतांमध्ये संदीप दिनकर फाटक (40), किरण संदीप फाटक (32) व मैथिली संदीप फाटक (वय 10) अशी मयतांची नावे आहेत. आई-वडिलांनी प्रथम मुलीला गळफास देऊन नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. फाटक हे व्यावसायीक होते मात्र व्यवसायात नुकसान झाल्याने या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी? असा अंदाज व्यक्त होत आहे.
भुसावळातून दुचाकी चोरणारा चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
