आईसह दोघा मुलांचे मृतदेह आढळले


मुंबई : आईसह दोघा मुलांचे मृतदेह एकाचवेळी आढळल्याने मीरा रोड परीसरात मोठी खळबळ उडाली. मीरा रोड भागातील नरेंद्र पार्क पार्क कॉम्प्लेक्समधील एका इमारतीत ही धक्कादायक घटना घडली. नसरीन वाघू (47), मुलगी सय्यद नाझ (21) आणि मुलगा मोहम्मद अर्श (13) अशी मृतांची नावे आहेत. तिघांच्या मृत्यूचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुलगा आणि मुलगी दोघेही मतिमंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृत महिलेला पती खूप पूर्वी सोडून गेल्याने हे कुटुंब त्यांच्या आजी -आजोबांच्या घरी राहत होते. सोमवारी दुपारी आई आणि मुलांमध्ये भांडण झाले. त्यानंतर तिघेही रात्री एकत्र झोपले मात्र सकाळी तिघेही मृत अवस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात काही झोपेच्या गोळ्याही सापडल्या आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास मीरा रोड परिसरातील नवीन नगर पोलिस करीत आहेत. तिन्ही मृतदेह पोलिसांनी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनसाठी हलवण्यात आले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !