एक लाखांची लाच घेताना सहा.निरीक्षकासह पंटर एसीबीच्या जाळ्यात


पुणे : विमानतळ पोलीस ठाण्यातील सहा. पोलीस निरीक्षक राहुल अशोक पाटील (33) आणि खासगी व्यक्ती संतोष भाऊराव खांदवे (45, रा. लोहगाव) यांना एक लाखांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने अटक केली. फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी 5 लाखांची मागणी करीत त्यापैकी एक लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

गुन्ह्यात मदतीसाठी पाच लाखांची मागणी
तक्रारदार यांच्या वडिलांवर विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये जामीन मिळण्यास मदत होईल व तपासात आवश्यक ती मदत करण्यासाठी सहा.पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. या तक्रारीची पडताळणी 7 व 8 सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यात तडजोडीअंती 3 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविण्यात. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लोहगाव येथे सापळा रचला. खाजगी व्यक्ती संतोष खांदवे याला तक्रारदाराकडून एक लाख रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील हे शिवाजीनगर न्यायालयात होते. सापळा कारवाई यशस्वी झाल्याचे समजताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयातून राहुल पाटील यांना ताब्यात घेतले. दोघांवरही विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे न्यायालयातून सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांना ताब्यात घेण्यात आले.




 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !