गुंडाचा महिलेवर अत्याचार


बीड : 32 वर्षीय महिलेवर कुख्यात कुंडाने अत्याचार केला शिवाय यानंतर विवाहिता गर्भवती असल्याचे कळाल्यावर महिनाभराच्या आत लग्न करण्याचे आमिष दाखवून विवाहितेला बळजबरीने गोळ्या खायला देत तिचा गर्भात करण्यात आला. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून संशयीत पसार झाला. गांधी नगरातील एका 32 वर्षीय पीडित महिलेवर 14 फेब्रुवारी 2017 ते 31 जानेवारी 2021 या दरम्यान अमोल लक्ष्मण पौळे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) याने वारंवार बळजबरीने अत्याचार केला. यातून पीडितेला गर्भधारणा झाली. याची माहिती होताच अमोल पौळे याने महिन्याच्या आत लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला विश्वास दिला. त्यानंतर तिला बळजबरीने दोन गोळ्या खायला लावल्या. त्याच रात्री तिचा गर्भपात झाला. आरोपीने पीडितेला शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले व याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पोबारा केला. पीडितेने 8 सप्टेंबर रोजी शहर ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यावरून अमोल पौळेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !