चिमुकल्यासह आईची आत्महत्या


थेऊर : 30 वर्षीय महिलेने आपल्या दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आळंदी म्हातोबाची येथे शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कविता देविदास भोसले (30, रा. भेकराईनगर, मूळगाव उमरगा, जि.उस्मानाबाद) व प्रणित देविदास भोसले (2) अशी मृतांची नावे आहेत. कविता आपल्या मुलासह मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार कविताच्या नातेवाईकांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार हडपसर पोलीस कविता यांचा शोध घेत असताना कविताच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन आळंदी म्हातोबा येथे असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार लोणी काळभोर पोलिस व हडपसर पोलीस आळंदी म्हातोबाची गावाच्या परिसरात शोध घेत असताना, गायकवाड वस्ती येथील एका विहिरीत महिलेचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदरचा मृतदेह हा कविता व तिच्या मुलाचा असल्याचे आढळून आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !