मुंबईतील ‘त्या’ बलात्कार पीडीतेचा अखेर मृत्यू


मुंबई : अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाला आहे. ुंबई पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. ज्या अमानुष पद्धतीनं तिच्यावर अत्याचार झाले होते त्याचं वर्णनही करता येणार नाही. अतिरक्तस्त्राव झाल्यानं पीडितेची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. शनिवार, 11 रोजी सकाळी तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं कळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील रुग्णालयात तिच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. या प्रकरणातील एक नराधम गजागाड असून यात आणखी काहींचा समावेश होता का याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यामुळे आता आरोपीविरोधात खूनाच्या गुन्ह्याचीही नोंद केली जाणार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !