व्याजाच्या पैशांसाठी तगादा आणि मारहाण केल्याने गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : चाकणमधील म्हाळुंगे परिसरात व्याजाच्या पैशांसाठी तगादा आणि मारहाण केल्याने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण येथे कंपनी चालवण्यासाठी व्याजाने पैसे घेतले होते.
पैसे वेळेत न दिल्याने व्याजाने देणाऱ्या व्यक्तीने तगादा लावला होता. एवढेच नाही तर योगेश रेड्डी यांना मारहाण करण्यात आली. हाच त्रास सहन न झाल्याने त्यांचा भाऊ धंनजय रेड्डी यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. सूरज गजरे असे व्याजाने पैसे देणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला म्हाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या प्रकरणी योगेश रेड्डी यांनी म्हाळुंगे पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश रेड्डी आणि गळफास घेऊन आत्महत्या करणारे धंनजय हे दोघे सख्खे भाऊ आहेत.
त्यांची चाकण परिसरात कंपनी असून ती चालवण्यासाठी पैसे हवे होते. त्यांनी सूरज गजरे नावाच्या व्यक्तीकडून दहा लाख रुपये व्याजाने घेतले होते तसेच इतर काही जणांकडून काही रक्कम घेतली होती.
अशी माहिती म्हाळुंगे पोलिसांनी दिलीय. दरम्यान, याची मध्यस्थी मयत भाऊ धंनजय यांनी केली होती. परिस्थिती खालावल्याने वेळेत व्याज देता येत नव्हते.
याच कारणाने फिर्यादी योगेश यांना आरोपी सूरज गजरे याने गाडीत बळजबरी बसवून नेऊन त्यांना मारहाण करत धमकावले होते. याच त्रासाला कंटाळून भाऊ धंनजय यांनी बंद फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात सूरज याच्या नावाचा उल्लेख केला आहे.
चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं आहे?
काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते.
ते पैशे मागत होते.
त्यांनी तगादा लावला होता.
