धक्कादायक ! : दागिन्यांसह पैशांसाठी तगादा लावणार्या विवाहित प्रेयसीचा खून
मथुरा : विवाहित असताना पाच वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या विवाहितेकडून सातत्याने पैशांसह दागिन्यांची मागणी केली जात असल्याने या प्रकाराला कंटाळून प्रियकराने विवाहितेची गोळी मारून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करीत प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. रणजीत असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर निरज असे मयत विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा
जमालपूर गावात तीन दिवसांपूर्वी एका शेतामध्ये महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला. पैसे आणि दागिन्यांच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्याने विवाहित प्रेयसीचा काटा काढल्याची कबुली आरोपी रणजीतने दिली आहे. पोलिसांनी त्या प्रियकराला अटक करून त्याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त केले आहे. आरोपीकडून पोलिसांनी महिलेचा मोबाईल, पिस्तूल, एक खोका काडतूस आणि एक बाईक जप्त केली.
