नाशिकही हादरले : महिलेवर कारमध्ये बलात्कार


नाशिक : सिन्नर तालुक्यातील शहा शिवारात एका महिलेची दुचाकी अडवून तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी वावी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिन्नर तालुक्यातल्या शहा शिवारात सोमवारी पीडित महिला दुचाकीवरून पंचाळे-कोळपे रोडवरून जाताना संशयीत आरोपी प्रशांत राजाराम सांगळे (रा.माळेगाव, ता.सिन्नर) याने पाठलाग करीत महिलेला गाठले. महिलेच्या दुचाकीसमोर कार लावून अडवले. त्यानंतर महिलेला बळजबरने आपल्या कारमध्ये टाकल्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. सोबतच महिलेचे मोबाइलमध्ये फोटो काढले. या प्रकरणाची कुठे वाच्यता केली, तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली. या प्रकरणी महिलेने वावी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !