40 वर्षीय महिलेवर युवकाचा बलात्कार
वर्धा : दुचाकीवर फिरण्यासाठी नेतो म्हणून 40 वर्षीय महिलेला एका लॉजमध्ये नेल्यानंतर 24 वर्षीय युवकाने अत्याचार केला. अत्याचाराची वाच्यता केल्यास समाजात बदनामीची धमकी दिल्याने पीडीतेने तक्रार दिली नाही मात्र या अत्याचारातून पीडीता आठ महिन्यांची गर्भवती राहिल्याने पीडीतेने आरोपी हरीष उत्तम किंदरणे (आंबेडकर वॉर्ड) याच्या विरोधात तक्रार दिल्याने त्यास अटक करण्यात आली.
लॉजवर नेत केला अत्याचार
पीडिता आणि आरोपी हे दोघेही आर्वी येथील एका जिनींगमध्ये कामावर होते. दोघांचीही एकमेकाशी ओळख झाली. पीडिता कामावर गेली असता आरोपी हरिषने तुला फिरायला नेतो, असे म्हणून दुचाकीवर बसवून शहरातील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच कॅनलमध्ये नेवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. पीडिता ही आठ महिन्याची गर्भवती राहिल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले असता हा प्रकार उघडकीस आला. अखेर पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी हरिषविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
