ओळखीचा फायदा घेत विवाहितेवर अत्याचार
सांगली : पाणी पिण्याचा बहाण्याने घरात शिरल्याने विवाहित महिलेवर 30 वर्षीय आरोपीने अत्याचार केला. या प्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात सचिन गौतम माने (30, रा.बामणोली, ता.मिरज) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीतेच्या कुटुंबाशी आरोपीची ओळख असल्याने ओळखीचा फायदा घेत शुक्रवारी आरोपी पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडित महिलेच्या घरी गेला. घरी कोणी नसल्याचे पाहून संबंधिताने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर ‘कोणास काही सांगितलेस तर तुला जिवंत ठेवणार नाही.’ अशी धमकी देऊन तो पसार झाला. पीडित महिलेने संशयिताविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित माने याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
