सावद्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली विविध विकासकामांची पाहाणी


सावदा : आमदार चंद्रकांत पाटील यांनी सावदा येथे भेट देऊन नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या व आमदार निधीतून सुरू असलेल्या कामांची माहिती जाणून घेतली. आमदार पाटील यांनी सुगंगानगर, ख्वाजा नगर, सोमेश्वर नगर परीसरातील नागरीकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. सुगंगानगरात असलेला नाला बुजवण्यात आल्याने तो त्वरीत मोकळा करावा व या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट असल्याने पाण्याची टाकी या परीसरात व्हावी अशी मागणी या परीरसरातील नागरीकांनी केली. हा परिसर नगरपालिका हद्दीत येत असल्याने नगरपालिकेने जर नाहरकत दाखला दिला तर या परीसरासाठी जलकुंभासाठी निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही आमदारांनी दिली.

खडीकरण कामाची पाहणी
सोमेश्वर नगर परीसरात रस्त्याचे खडीकरण आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून होत असल्याने त्याची पाहणी करण्यात आली तसेच या भागातील समस्या जाणून घेण्यात आल्या व उपाययोजनांचे आश्‍वासन देण्यात आले.निमजाय माता मंदिर ते खाजा नगर हा पाचशे मीटर रस्ता कामाला सुरूवात होणार असून घटस्थापनेच्या आधी खडीकरण व स्ट्रीट लाईटचे काम तात्काळ करावे, असे आदेश महावितरणचे कर्मचारी व इंजिनीयर यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना, उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, मिलिंद पाटील, माजी नगरसेवक श्याम पाटील, सावदा शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, मनीष भंगाळे, गौरव बेरवा, गणेश माळी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !