कुर्हा-वढोदा उपसा सिंचनच्या अपूर्ण कामांसाठी भरीव निधी देणार : जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मुक्ताईनगर : कुर्हा-वढोदा उपसा सिंचन योजनेच्या अपूर्ण कामांसाठी भरीव निधी देणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. जोंधनखेडा धरणाच्या ऑनलाईन जलपूजनप्रसंगी ते बोलत होते. एकनाथराव खडसे हे जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक जलप्रकल्पांना मान्यता मिळाली मात्र काहींची कामे पूर्ण होवू शकली नसलीतरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या प्रकल्पांना निधी देण्यात येईल. भविष्यात बंद वितरीकेद्वारे शेतीला पाणी देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, जोंधनखेडा गावाजवळ गोरक्ष गंगा नदीवर असलेल्या कुंड धरणाचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याहस्ते व्हिडीओ कॉन्फरस द्वारे तर प्रत्यक्षात धरणस्थळी माजी महसूल, पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, गोटू सेठ महाजन, सरचिटणीस ईश्वर रहाणे, अशोक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती सुनीता चौधरी, बोदवड पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, व्हिजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, प्रवक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले, युवक जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना कांडेलकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल महाराज खोले यांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच रवींद्र पाटील यांनी मानले.








