शेतकर्यांना 50 हजारांची मदत सरसकट द्या : खासदारांना साकडे
बोदवड : खासदार रक्षा खडसे यांनी बोदवड तालुक्यातील नऊ गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. तालुक्यातील कपाशी, मका, ज्वारी, तीळ या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकर्यांना 50 हजारांची सरसकट मदत पंचनामा करता जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे खासदारांना निवेदन देऊन करण्यात आली. निवेदनावर पुरुषोत्तम पाटील, नाना पाटील, प्रवीण मोरे, सुवर्णसिंग हजारी, पूजाजी पाटील, राहुल वाघ, राजेंद्र चौधरी, निलेश भाकरे यांच्यासह शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.








