चार दिवसात तीन अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडले : रावेर महसूलची कारवाई
रावेर : रावेर शहरातील महसूल विभागाच्या विभागाने गत चार दिवसात तीन अवैधरत्या वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टर-ट्रॉली वर कारवाई केल्याने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सोमवार, 4 रोजी सावदा-वाघोदा रस्त्यावर खिरोदा व निंभोरा मंडळ आधिकार्यांच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास अवैध वाळूचे विना नंबरची ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली तर दुसरे अवैध वाळूचे विना नंबरचे ट्रॅक्टर-ट्रॉली मंगळवार, 5 रोजी पहाटे छोरीया मार्केट येथे मंडळ अधिकारी विठोबा पाटील, सचिन पाटील, गणेश चौधरी यांनी ही कारवाई केली तसेच गुरुवार, 7 रोजी अटवाडे येथे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. ही कारवाई खानापूर व ऐनपूर मंडळ अधिकारी यांनी केली. यातील दोन ट्रॅक्टर मालकांना दंड भरण्याबाबत कौशल चौधरी यांनी नोटीस काढल्या आहेत. गेल्या चार तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहतूकदारांविरोधात जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे.
