रेल्वे प्रवासात विद्यार्थिनीची छेड काढणे भोवले : एनसीबी अधिकार्याला रेल्वे पोलिसांनी केली अटक
परळी : हैदराबाद-हडपसर रेल्वे गाडीमध्ये गुरुवारी विद्यार्थिनीची छेडखानी झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी एनसीबीचा (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग) मुंबई येथील अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण यास अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 354, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्याची आला.
रेल्वेत विद्यार्थिनीची छेडखानी
गुरुवारी रात्री हैदराबाद-पुणे या रेल्वेने एनसीबीचा एक अधिकारी व एक विद्यार्थिनी प्रवास करीत असताना त्या अधिकार्याने विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानुसार विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला आहे.



