जळगावात तीन नगरसेवक स्वगृही भाजपात परतले


जळगाव : महापालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांनी आपल्या पक्षात घरवापसी केल्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. लवकरच महापालिकेची महासभा होत असून यात स्थायी समिती सदस्य आणि सभापतींची निवड होणार आहे. या निवडीआधी दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या बंडखोर गटाचे गटनेते दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केलेल्या अर्जावरून विभागीय आयुक्तांनी भाजपच्या 27 नगरसेवकांना अपात्र करण्यात का येऊ नये अशा आशयाच्या नोटीसा बजावल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता भाजपने याची परतफेड करून बंडखोर गटातील तिघांना गळाशी लावले आहे. नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभा बारी, व हसीना बी. शेख या तीन सदस्यांनी आज पुन्हा आपण भाजपासोबत असल्याचे जाहीर केले आहे. या तिघांचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले.

दहिवदजवळ स्पिरीटची हेराफेरी : दोन टँकर जप्त 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !