अत्याचारातून तरुणी सहा महिन्यांची गर्भवती


नवी दिल्ली : 18 वर्षीय तरुणीवर घराशेजारीच राहणार्‍या तरुणाने सातत्याने अत्याचार केल्याने तरुणी गर्भवती राहिली मात्र गर्भपातासाठी तरुणाने काही गोळ्या दिल्यानंतर तरुणीच्या पोटात दुखू लागताच तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. यावेळी तरुणी सहा महिन्यांची गर्भवती निघाली व अत्याचाराची घटना उघड झाली. पीडितेच्या कुटुंबाने तिचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. परंतू पोलिसांना संशय असल्याने तिचे खरे वय काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. ते समजल्यानंतर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवायचा की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. झालावाड जिल्ह्याच्या मंडावर पोलीस ठाण्यात हे प्रकरण नोंद झाले आहे. शनिवारी मुलीच्या अचानक पोटात दुखू लागले. यामुळे तिच्या पालकांनी तिला स्थानिक हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले. तेव्हा डॉक़्टरांनी ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले आणि सार्‍या प्रकाराचे बिंग फुटले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !