तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही, म्हणत प्रियकराने मोडला विवाह
धायरी : लग्नापूर्वी बहरलेले प्रेम कायम ठेवण्यासाठी प्रियकराने स्वतःच्या लग्नानंतरही प्रेयसीचा पिच्छा सोडला नाही. प्रेयसीचा विवाह निश्चित झाल्यानंतर प्रियकराने हा विवाह मी होवू देणार नाही, तु माझीच असून तुला मी कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणत दम भरल्याने प्रेयसीचा विवाह मोडला. या प्रकरणी प्रशांत दिलीप हागवणे (रा. नांदोशी रोड, किरकटवाडी, ता. हवेली, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत 21 वर्षीय तरूणीने हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सोशल मिडीयावरून झाली ओळख
हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत व पिडीत तरूणीची फेसबुकवरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले व मैत्रीचे रूपांतर प्रेमात. त्यानंतर गेली तीन ते चार वर्ष दोघेही प्रेमात होते. त्यांना विवाह देखील करायचा होता. तरूणीच्या कुटूंबाने विवाहाला परवानगी दिली होती मात्र प्रशांतच्या कुटूंबाचा या विवाहाला विरोध होता. तरूणी अन्य जातीची असल्याने प्रशांतने कुटूंबाच्या सांगण्यावरून दुसर्या मुलीशी विवाह केला. त्यानंतर या तरूणीने प्रशांतची संपर्क बंद केला. परंतु, काही दिवसांनी पुन्हा प्रशांतने पिडीत तरूणीशी संपर्क साधण्यास सुरूवात केली.

