खासदार भावना गवळी यांना चिकन गुनियाची लागण : ईडीकडे मागितली मुदत
मुंबई : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली असून त्यांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितली आहे. खासदार भावना गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ही माहिती दिली आहे. भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाल्याने त्या बुधवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत तसेच पुढील 15 दिवस गैरहजर राहण्यासाठी त्यांनी ईडीकडून वेळ मागितला असल्याचे इंद्रपाल म्हणाले. भावना गवळी यांच्याकडून ईडीला प्रकृतीच्या अस्वस्थाबाबतचं पत्रं देण्यात येणार असून मेडिकल सर्टिफिकेटही देण्यात येणार आहे.








