यावल शहरात वाहने ढकलत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महागाईचा निषेध


यावल : यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी बैठक झाली. बैठकीनंतर पदाधिकार्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पासून वाहन ढकलत यावल तहसील कार्यालयांपर्यंत आणली. यावेळी नायब तहसीलदार राहुल सोनवणे व नायब तहसीलदार मुक्तार तडवी यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावल येथे निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.देवकांत बाजीराव पाटील, शहर युवक अध्यक्ष हितेंद्र गजरे, जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, तालुका समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष किशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष पवन पाटील, समाधान पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते राजेश करांडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष राकेश सोनार, राहुल चौधरी, धनराज पालक, समीर तडवी, विजय भोई, भरत भोई, छत्रपती फाउंडेशन संचालक गिरीश पाटील, तात्या कोळी, यशवंत अडकमोल, युवराज भास्कर पाटील, कैलास अडकमोल, चंद्रकांत कोळी, मुस्तुफा तडवी आदींसह तालुक्यासह शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !