ऐनपूरच्या सिलिंडर स्फोट दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची खासदार रक्षा खडसेंनी घेतली भेट
ऐनपूर : दसरा सणाच्या दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन काशिनाथ बारी यांच्या घरातील भांडे, कागदपत्रे, छतावरील पत्रांचे खूप नुकसान झाल्याने या गरीब कुटुंबाचा संसार उघड्यावर आला. खासदार रक्षा खडसे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन पाहणी केली. तसेच कुटुंबाला तत्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी तहसीलदार तसेच गॅस कंपनी अधिकारी यांच्याशी घटनेबाबत चर्चा करून लवकरात लवकर मदत देऊन या कुटुंबाला दिलासा देण्याबाबत सूचना केल्या. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, रावेर तालुका सरचिटणीस शुभम पाटील, कमलेश महाजन, एकनाथ पाटील, सरपंच अमोल महाजन, नीलेश जैस्वाल, विनोद महाजन, पंकज पाटील, जयराम कोळी, ज्ञानेश्वर महाजन, लखन पाटील, संदेश महाजन, यश महाजन, शिवम महाजन, अभिषेक पाटील, स्वप्नील मावळे, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.








