भुसावळात राष्ट्रवादी पदाधिकार्यांतर्फे आमदार रोहित पवारांचे स्वागत
भुसावळ : जिल्हा दौर्यावर आलेले कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचे भुसावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी सकाळी नाहाटा चौफुलीवर ढोल-ताशांच्या गजरात व हार-बुके देवून जल्लोषात स्वागत केले. यावेळी भुसावळ कृउबाचे सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर, सचिन पाटील, ललित मराठे, साजीद भाई, रंजीत भैया, तमा पैलवान, विशाल नारखेडे, विशाल ठोके, राजू भोई, समीर शेख, तुषार चौधरी आदींची उपस्थिती होती.



