जळगाव जिल्हा बँकेत आमच्या सोबत दगा-फटका : माजी मंत्री गिरीष महाजन


रावेर : जळगाव जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनलच्या नावाखाली आमच्यासोबत दगा-फटका करण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याने हे सर्व घडले आहे. मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत सर्वपक्षीय पॅनल संदर्भात बोललो परंतु त्यांनी आपली भूमिका बदलली. हे सर्व जिल्ह्यातील झारीच्या शुक्राचार्यांमुळे घडल्याचा आरोप कुणाचेही नाव न घेता माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी रावेरात केला.

रावेरात पदाधिकार्‍यांशी चर्चा
माजी मंत्री गिरीष महाजन हे मध्य प्रदेशात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ जात असता त्यांनी काही वेळ रावेरात थांबुन पदाधिकारी-लोकप्रतिनिधींशी आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली. यावेळी नगरसेवक सुधीर पाटील यांनी आगामी पालिकेची निवडणूक तोंडावर असताना भाजपात प्रवेश केला. यावेळी जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, भाजपाचे संदीप सावळे, पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक यशवंत दलाल आदी भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.







आगामी निवडणूकांमध्ये भाजपा स्वबळावर
जिल्ह्यात होवू घातलेल्या बाजार समिती, नगरपालिका निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार असल्याचे माजी मंत्री महाजन यांनी येथे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेचा कौल भाजपालाच मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत रावेरातून जिल्हा बँकेसाठी उमेदवारी दाखल केलेले नंदकिशोर महाजनदेखील उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !