आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत : जळगाव जिल्हाधिकार्यांना निवेदन
भुसावळ : औष्णिक विद्युत प्रकल्प निर्मितीच्या वेळी पिंप्रीसेकम येथील रमाकांत प्रल्हाद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती पिंप्रीसेकमच्या माध्यमातून औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रशासनासमोर आंदोलने करण्यात आली. यावेळी पिंप्रीसेकमसह परीसरातील महिला व पुरुष कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी रमाकांत चौधरी अनेकदा अधिकार्यांकडे केली शिवाय शासनाच्या निघालेल्या निर्णयानुसार पत्रव्यवहार देखील करण्यात आला. सोमवार, 25 रोजी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे व रमाकांत चौधरी यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तसेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांना निवेदन देत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
