राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी 27 व 28 रोजी निवड चाचणी
भुसावळ : रायगड येथे सब ज्युनिअर मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धा होत असून या स्पर्धेतील संघासाठी निवड चाचणी बुधवार, 27 व गुरुवार, 28 ऑक्टोबर रोजी कंडारी येथे होत आहे. भुसावळ तालुका बॉक्सींग असोसिएशन अंतर्गत येणार्या सर्व बॉक्सींग क्लब असोसिएशनचे अध्यक्ष, चिटणीस, कोचेस (प्रशिक्षक) यांनी निवड चाचणी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बुधवार, 27 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कॅशियस स्पोटर्स अॅकेडमी, कंडारी तसेच गुरुवार, 28 रोजी सायंकाळी साडेचार वाजता कॅशियस स्पोटर्स अॅकेडमी, कंडारी येथे इच्छूकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भुसावळ तालुका बॉक्सिंग असोशिएशनचे अध्यक्ष राहुल घोडेस्वार (9923540042), सह.चिटणीस पवन शिरसाठ (9021282822) यांनी केले आहे.
