गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत : आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेने शहरातील मोहाडी रोड परीसरातून गुरुवारी दुपारी मुसक्या आवळल्या आहेत. विक्की महेंद्र कोळी (20, रा.समता नगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीच्या ताब्यातून 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वात सहा.फौजदार अशोक महाजन, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीजत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !