तीन हजारांची हजारांची लाच भोवली : दहिवेल तलाठी धुळे एसीबीच्या जाळ्यात
धुळे : वारस चौकशी अहवाल व शेत जमिनीचे सातबारा उतारे देण्यासाठी तडजोडीअंती तीन हजारांची लाच स्वीकारणार्या साक्री तालुक्यातील दहिवेल येथील तलाठ्यास धुळे एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. तानाजी धोंडिबा वाजे (39) असे अटकेतील तलाठ्याचे नाव आहे.
लाच स्वीकारताच केली अटक
32 वर्षीय तक्रारदार यांच्या वडिलांचा वारस चौकशी अहवाल व शेत जमिनीचे सातबारा उतारे देण्यासाठी संशयीत आरोपी तानाजी वाजे यांनी गुरुवार, 28 रोजी सात हजारांची लाच मागितली मात्र त्यात तडजोड होवून तीन हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दहिवेल, ता.साक्री येथील तलाठी कार्यालयातच लाच स्वीकारताना तानाजी वाजे यांना धुळे एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष रंगेहाथ अटक केली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे (वाचक), धुळे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे व पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, कैलास जोहरे, जयंत साळवे, शरद काटके, कृष्णकांत वाडीले, राजन कदम, पुरुषोत्तम सोनवणे, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, संदीप कदम, महेश मोरे, गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे, बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

