भुसावळात अप काशी एक्स्प्रेसमध्ये अनोळखी प्रवाशाचा मृत्यू
भुसावळ : अप काशी एक्स्प्रेसमध्ये 35 वर्षीय अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 27 रोजी अप काशी एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर आल्यानंतर उघडकीस आली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अप काशी एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस- 4 मध्ये 35 वर्षीय प्रवासी नैसर्गिकरीत्या मयत स्थितीत आढळला. उंची पाच फूट, रंग सावळा, शरीर बांधा सडपातळ, डोक्याचे केस अर्धवट काळे, दाढी बारीक वाढलेले, उजव्या हाताच्या पंज्यावर ओम गोंदलेले, डाव्या हातावरील गोंदलेले समजून येत नाही तसेच अंगात काळ्या रंगाचा फुलबाहीचा शर्ट, जीन्स पँट असे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्गचे पोलीस ही बातमी वाचली का- नाईक राजेंद्र गवई (7218583441) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
