भुसावळात वृद्ध महिलेच्या पर्सला ब्लेड मारून 20 हजार लांबवले
भुसावळ : दिवाळीची खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध महिलेच्या पर्सला ब्लेड मारून 20 हजारांची रोकड लांबवण्यात आली. ही घटना शुक्रवार, 29 रोजी बाजारपेठेत घडली. या प्रकाराणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्सला ब्लेड मारत लांबवली रोकड
वरणगाव येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी बबन रघुनाथ सपकाळे हे शुक्रवारी पत्नी ललिता सपकाळे यांच्या सोबत दिवाळीच्या खरेदीसाठी भुसावळात आले होते. दुपारी तीन वाजता भुसावळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथून त्यांनी 20 हजार 500 रुपये विड्रॉल करत पैसे पर्समध्ये ठेवून ते बाजारात गेले असता ललिता सपकाळे यांच्या पर्सला स्टेट बँक ते मरीमाता मंदिरादरम्यान अज्ञात चोरट्याने ब्लेड मारत 20 हजारांची रोकड लांबवली. मरीमाता मंदिराजवळ रांगोळी खरेदीचे पैसे देत असताना पैसे चोरी झाल्याचे लक्षात आले. सपकाळे दाम्पत्याने बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरुध्द्व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



