भुसावळातील वृत्तपत्र हॉकर्स बांधवांची दिवाळी झाली ‘गोड’
विघ्नहर्ता पब्लिकेशन्सने जपली माणुसकी : सणानिमित्त मिठाईसह कपड्यांची भेट
भुसावळ : ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता अखंडीतपणे भल्या पहाटे वाचकापर्यंत वृत्तपत्र पोहोचण्यासाठी झटणार्या वृत्तपत्र हॉकर्स बांधवांची दिवाळी गोड होण्यासाठी भुसावळातील विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी यांनी सलग पाचव्या वर्षी शनिवारी सकाळी 11 वाजता दिवाळी सणाचे औचित्य साधून सुमारे 70 हॉकर्स बांधवांना साडी, ड्रेस व मिठाईचे वाटप करून समाजात अद्यापही माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय दिला. निमाणी यांच्या उपक्रमाचे सर्वच वृत्तपत्र वाटप करणार्या हॉकर्स बांधवांनी मनपूर्वक कौतुक करीत आभारही मानले.
रवी निमाणी जपताय बांधीलकीचा वसा
डिजिटल युगात वृत्तपत्राचे महत्व आजही अबाधीत असून सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य अंग असलेल्या वृत्तपत्राला भल्या पहाटेच वाचकापर्यंत पोहोचवण्यात वृत्तपत्र हॉकर्स मंडळी निभावत असते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे भले-भले घराबाहेर पडत नसताना स्वतःचा जीव धोक्यात घालून या विक्रेत्यांना वाचकापर्यंत अंग पोहोचवत आपली व्यवसायाप्रती निष्ठा दाखवून दिली. प्रतिकुल परीस्थितीत आपल्या संसाराचा रहाटगाडा ओढणार्या हॉकर्स बांधवांप्रती संवेदना जोपासत भुसावळातील विघ्नहर्ता पब्लिकेशन्सचे संचालक रवींद्र निमाणी यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सुमारे 70 बांधवांना साडी, पँटशर्ट, नमकीन व मिठाईचा बॉक्स देवून शुभेच्छा दिल्या. निमाणी यांच्या उपक्रमामुळे हॉकर्स बांधवदेखील भारावल्याचे यावेळी दिसून आले.



यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास दिव्य मराठीचे निवासी संपादक दीपक पटवे, मुख्य उपसंपादक विकास पाटील, दिव्य मराठीचे डेप्युटी न्यूज इडीटर आनंदा पाटील, दिव्य मराठचे वितरण विभागप्रमुख कलीम खान, वरीष्ठ पत्रकार श्रीकांत सराफ तसेच विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी, बंटी (देवेंद्र) निमाणी, जय निमाणी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगीता बेदरकर, बबलू ठाकूर व शिरीष जोशी आदींनी सहकार्य केले.
