भुसावळात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर
भुसावळ : भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय लेवा महसंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा.धीरज गणेश पाटील आणि प्रा.सीमा धीरज पाटील यांच्या संकल्पनेतून भुसावळ परीसरातील नागरीकांच्या निरोगी आरोग्यासाठी भव्य मोफत आरोग्य शिबिर रविवार, 31 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 8 ते 11 वाजेदरम्यान सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यासमोर, जुना सातारा, भुसावळ येथे होत आहे.
रक्ताच्या चाचण्या मोफत
या शिबिरात मशिनद्वारे डोळ्यांची तपासणी, मशिनद्वारे हाडांतील कॅल्शिअमची तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर, ऑक्सिजन लेव्हल तपासणी, दातांची तपासणी, लहान मुलांच्या आजारांची तपासणी, कान, नाक व घसा तपासणी मोफत केली जाणार आहे तसेच रक्तातील पेशी, हिमोग्लोबिन, थायरॉईड, कावीळ, मलेरिया, लिव्हर आणि किडनीच्या विविध अति महाग चाचण्या मोफत करून मिळणार आहेत. भुसावळ परीसरातील नामांकित तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोफत शिबिराचा परिसरातील नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिबिराचे संयोजक अखिल भारतीय लेवा महसंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा.धीरज गणेश पाटील यांनी केले आहे. मोफत नाव नोंदणीसाठी 7709044904 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



