मुक्ताईनगरात तीन लाखांची धाडसी घरफोडी


मुक्ताईनगर : शहरातील सरदार वल्लभभाई पटेल नगर भागातील बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिन्यासह रोख रक्कम असा तीन लाख 16 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान घडली. उचंदा येथील रहिवासी सध्या मुक्ताईनगर येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर भागातील रहिवासी शोभा अशोक पाटील या गुरुवार, 28 रोजी देवदर्शनासाठी उचंदा येथे गेल्याने घर बंद असल्याची चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडत कपाटातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून तीन लाख 16 हजारांचा ऐवज लंपास केला. शोभा पाटील या 30 रोजी घरी आल्यानंतर घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसल्याने चोरीची घटना उघडकीस आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !